लाखनी : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरपटाच्या निमित्ताने ग्राम पिंपळगाव/सडक येथे कृषी विकास परिषद व कृषी प्रदर्शनी 2025 चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
कार्यक्रमात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, अत्याधुनिक कृषी अवजारे, व्यवस्थापन प्रणाली, तसेच शेतमाल उत्पादन व विपणन तंत्रांचा परिचय करून देण्यात आला. शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळावी, या उद्देशाने विविध कृषी उपकरणे, पशुपालन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धतींचे प्रदर्शन भरविण्यात आले.
कार्यक्रमाला विविध मान्यवर, कृषी तज्ज्ञ, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

