तिरोडा येथील दुर्गेश टोलीराम गौतम यांना पीएचडी पदवी प्रदान

0
173

कठोर मेहनतीतून मिळविले शैक्षणिक यश, परिसरातून कौतुकाचा वर्षाव

तिरोडा: पोमेश राहांगडाले

तिरोडा येथील रहिवासी आणि सध्या लोकनेते डॉ. जे.डी. पवार फार्मसी कॉलेज ऑफ फार्मसी, मनूर, कळवण (जि. नाशिक) येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या दुर्गेश टोलीराम गौतम यांना डॉ. एम. जी. आर. मेडिकल युनिव्हर्सिटी, चेन्नई (तमिळनाडू) कडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

संशोधन कार्य आणि विषय

संशोधन मार्गदर्शक: प्रो. डॉ. टी. वेंकटचालम

संशोधन विषय:
“फायटोकेमिकल आणि फार्माकोलोजिकल अक्टिविटी ऑफ मायकेलिया चंपाका आणि वेडेलिया कायनेनसीस लिव्हज एक्ट्रॅक्ट फॉर नेफ्रोप्रोटेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी”

संशोधन संस्था:
जेकेकेएमएमआरएफ अन्नाई जेकेके संपूरानीअम्मल कॉलेज ऑफ फार्मसी, कोमरापलायम, जि. नमक्कल (तमिळनाडू)

शैक्षणिक वाटचाल

प्राथमिक शिक्षण : जि. प. शाळा, सोनी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया

माध्यमिक शिक्षण : जान्या तिम्या हायस्कूल, गोरेगाव, जि. गोंदिया

महाविद्यालयीन शिक्षण : शहीद मिश्रा ज्युनियर कॉलेज, तिरोडा

औषधनिर्माणशास्त्र पदवी (B. Pharm):नागपूर पदव्युत्तर शिक्षण (M. Pharm): आयपर, बोरगाव मेघे, वर्धा

व्यावसायिक अनुभव

सहाय्यक प्राध्यापक म्हणून अनुभव:

७ वर्षे: जळगाव

५ वर्षे: सावंतवाडी, सिंधुदुर्ग

सध्या कार्यरत: नाशिक येथील फार्मसी महाविद्यालय

दुर्गेश गौतम यांच्या पीएचडी पदवी मिळाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

श्री गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, कर्मचारी वर्ग तसेच कुटुंबीयांनी त्यांचे अभिनंदन केले.

परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या कठोर मेहनतीचे कौतुक केले.

 

 

Previous article९ फरवरी : स्व. मनोहरभाई पटेल जयंती पर प्रतिभावान विद्यार्थियों का स्वर्ण पदक से सम्मान
Next articleक्षत्रिय पोवार समाज की पावन अमृत गाथा