विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथकाची भेट

0
59

आमगांव : ग्रामीण रुग्णालय, आमगाव येथील आरोग्य पथकाने आज जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, चिरचाळबांध येथे भेट देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

या शिबिरात मा. डॉ. हेमंत ठाकरे, मा. डॉ. पद्मा देवांगण आणि कु. हेमा ताई शिवणकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. या वेळी मा. केंद्र प्रमुख ओ. एस. बिसेन सर, मुख्याध्यापक एन. बी. बिसेन सर, सहायक शिक्षक एस. एस. वाकले सर तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक तपासणीसाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेळोवेळी आरोग्याची काळजी घेण्याची प्रेरणा मिळेल, असे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले.