सहकारी भात गिरणीत उत्साहपूर्ण समारंभ संपन्न
आमगाव : गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सुरेश हर्षे यांचा आमगाव येथील सहकारी भात गिरणीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रवीण (गुड्डा) गहरवार होते. उपाध्यक्ष लोकेश अग्रवाल आणि माजी उपाध्यक्ष इसूलाल भालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरेश हर्षे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक राजकुमार फुंडे, धनराज गि-हेपुंजे, राजेंद्र चुटे, संदीपकुमार सेठिया, सुनील ब्राह्मणकर, अनिकेतसिंग कटरे, संजय निमावत, सौ. मोनिका घनश्याम फुंडे यांच्यासह कातुरळीच्या माजी सरपंच मनिषा मनोज फुंडे, चुन्नीलाल शहारे, रामचंद्र बहेकर, मोनू शर्मा, सोनू शर्मा, अनिल पाथोडे, महेश चुटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे संचालन धनराज गि-हेपुंजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सीताराम फुंडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि उत्साहात पार पडला.

