जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात संपन्न

0
156

आमगाव: श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती निमित्त गोंदिया जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि आदर्श सार्वजनिक वाचनालय, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मीत राठी, निर्भय डोलारे आणि रविशंकर नागपुरे यांनी आपापल्या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून आदर्श विद्यालय, आमगाव येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डी. एम. राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेश कोसरकर, उपमुख्याध्यापक डी. बी. मेश्राम, आदर्श सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुनील पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू रविशंकर नागपुरे यांनी आकर्षक योगासन प्रात्यक्षिके सादर केली.
तीन वेगवेगळ्या वयोगटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत आयुष राठोड, आदित्य बसोने, पुरुषोत्तम घाटोळे आणि परमेश्वर बोपचे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विशेष पुरस्कार मिळवले. विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या पंचपदाची जबाबदारी विनायक अंजनकर, सीमा नागपूरे आणि रविशंकर नागपुरे यांनी पार पाडली. बक्षीस वितरण सुरेश कोसरकर, ललित पटले आणि शशांक कोसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत गोंदिया, देवरी, आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

स्पर्धेच्या आयोजन आणि यशस्वीतेसाठी आदर्श वाचनालयाचे उपाध्यक्ष कुंजबिहारी शर्मा, सहसचिव ललित मानकर, संचालक झेड. एस. बोरकर, होमेंद्र पटले, डॉ. साजिद खान, डॉ. तेजस्विनी भुस्कुटे, प्रा. योगिता हलमारे, दिनेश शेंडे, कर्मचारी जगदीश बडगे, संजय राऊत आणि योगासन संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

ही स्पर्धा योगप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरली असून, भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.

 

Previous article“कैंसर विजेताओं का सम्मान: जज़्बे और हौसले को सलाम”
Next articleविद्यानिकेतन कॉन्वेंटमध्ये “आरंभ” थीमवर वार्षिक स्नेहसंमेलन साजरे