नागोबा देव यात्रा महोत्सव निमित्ताने राजेंनी देवस्थानाला भेट घेऊन नागोबा देवाचे केले विधिवत पूजन..
*गडचिरोली:-* जिल्ह्याच्या मुख्याल्यापासून ७ किमी अंतरावर असणाऱ्या कोटगल गावातील वैनगंगा नदीलगत “नागोबा देव” हे कोटगल गावाचे ग्रामदैवत असलेले ठिकाण आहे. कोटगल गावात ‘नागोबा देव’ या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरते.त्यावेळी हजारोच्या संख्येने नागोबा देव भक्तगन दर्शन घेण्यासाठी कोटगल या ठिकाणी येत असतात.
नागोबा यात्रा महोत्सव निमित्ताने यावेळी ‘भूक’ या नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज हे आले होते.त्यावेळी ढोल ताश्याच्या गजरात भव्य रॅली काढत त्यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच त्यावेळी राजे साहेबांनी नागोबा यात्रा महोत्सव निमित्ताने देवस्थानाचे भेट घेतली आणि नागोबा देवाचे विधिवत पूजन करून आशीर्वाद घेतला.”भूक”या नाट्य प्रयोगाचे उदघाट्न करून नागरिकांना मार्गदर्शक केले.
तसेच मंदिर परिसरात महाप्रसादाचे वितरण करत समस्त जनतेला नागोबा देव यात्रा महोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, कोटगल ग्रामपंचायतचे सरपंच ममताताई दूधबावरे, मुकेशजी नामेवार, श्रीकांत भाऊ नामनवार,रणजीत रामटेके,नागेशजी गावडे, मोहिनी ताई ठाकरे आणि मोठया संख्येने गावातील तसेच परिसरातील नागरिक हे उपस्थित होते..!!

