
स्व. मनोहरभाई पटेल जयंती सोहळ्याच्या नियोजनावर भर ; संघटन मजबूत करण्यासाठी चर्चा
सालेकसा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सालेकसा तालुका शाखेची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या सूचनेनुसार व जिल्हा परिषद गोंदियाचे नवनियुक्त उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तसेच पक्षाचे ओ.बी.सी. सेल राज्य सरचिटणीस प्रभाकर दोनोडे आणि तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत येत्या ९ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथे होणाऱ्या स्वनामधन्य स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंती सोहळ्याच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच सालेकसा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी विविध उपाययोजना करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यावेळी सुरेश हर्षे यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस माजी जिल्हा परिषद सदस्य बिसराम चर्जे, जियालाल पंधरे, लक्ष्मण नागपुरे, ब्रजभूषण बैस (शहर अध्यक्ष), श्रीमती गीताताई चौधरी, चुन्नीलाल सहारे, राजु डोंगरे, श्रीमती सुनीताताई थेर, अशोक गिरी, संतोष नागपुरे, दौलत अग्रवाल, रघुदास नागपुरे, संदीप मिश्रा, गगन छाबडा, बबलू बिसेन, महेंद्र कटरे, विजय भांडारकर, ओमप्रकाश पारधी, कमलेश लिल्हारे, अंकित मिश्रा, सौ. सीता अवस्थी, सौ. संतोषी चुटे, सौ. उषा वर्हाडे, सौ. सीमा बैस, जितेंद्र बडोले, महेश कुमार मच्छिरके यांच्यासह पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी राजकीय कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. तसेच पक्षाच्या विचारधारेनुसार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले.


