शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी शिक्षक समता वृद्धी प्रशिक्षणाला केले मार्गदर्शन

0
63

गडचिरोली /प्रतिनिधी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता विषयक विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासाठी शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरावरील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षकांचे निवासी जिल्हास्तर (TOT) प्रशिक्षण दिनांक 03 फेब्रुवारी 2025 ते 07 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये वेळ सकाळी 10.00 ते 06.00 पर्यंत शासकिय कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे आयोजित केले आहे.जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली कडून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर जिल्हास्तर प्रशिक्षणाला दिनांक 6 फेब्रुवारी रोजी  रणजितसिंह देओल( भाप्रसे ) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ,महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांनी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले व शिक्षकांकडून गुणवत्तेच्या कामाची अपेक्षा व्यक्त केली.यावेळेस आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा केंद्रांतर्गत येणाऱ्या थोटेवाडी शाळेची यशोगाथा त्यांनी ऐकून घेतली. व तेथील शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा कौतुक केला. जिल्ह्यातील सर्व शाळांनी व शिक्षक वृंदांनी सदर शाळेचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळेस त्यांनी केले. प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांच्याकडून तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला.यावेळी शिक्षण उपसंचालक श्री.लोखंडे, डायटचे प्राचार्य श्री चौरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री पवार, डॉ. विनीत मत्ते वरिष्ठ अधिव्याख्याता डायट गडचिरोली, डॉ. धनंजय चापले वरिष्ठ अधिव्याख्याता डायट गडचिरोली, तसेच विविध तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न
Next articleशिक्षण सचिव मा. देओल यांचा गोंदिया दौरा – विनानुदान शाळांच्या टप्पा वाढीबाबत सकारात्मक भूमिका