शिक्षण सचिव मा. देओल यांचा गोंदिया दौरा – विनानुदान शाळांच्या टप्पा वाढीबाबत सकारात्मक भूमिका

0
208

गोंदिया: महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव मा. देओल यांच्या गोंदिया जिल्हा दौऱ्यात त्यांचे स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व अनु. जाती मोर्चाचे जिल्हा महामंत्री उत्तम नंदेश्वर यांनी केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक समस्या तसेच विनानुदान शाळांच्या टप्पा वाढीबाबत चर्चा केली.

या चर्चेदरम्यान शिक्षण सचिव मा. देओल यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आणि यासंदर्भात योग्य पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. बैठकीस जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. महामुनी तसेच शिक्षण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.