आमगांव : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयाचा आनंद तालुक्यातील बोरकन्हार येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष राजू पटले, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था बोरकन्हारचे अध्यक्ष खुमेश कटरे, ज्येष्ठ कार्यकर्ते करंडे सर, गावचे सरपंच रवींद्र धरत, माजी उपसरपंच शैलेश मेश्राम, सुखदेव हुकरे, मानसिंग पटले, धनराज भलावी, माजी सरपंच भोजराज ब्राह्मणकर, वासुदेव रहांगडाले, मोरेश्वर फुंडे, कंपू राणा, सुरेश मटाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी दिल्लीतील विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले आणि पुढील राजकीय वाटचालीबाबत विचार मांडले. आनंदोत्सवात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

