जिजाऊ सावित्री रमाई मंच आमगावच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

0
360

आमगाव  : जिजाऊ सावित्री रमाई मंच, आमगावच्या वतीने बून यादी प्राथमिक शाळा, आमगाव येथे जिजाऊ, सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख आणि रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन 9 फेब्रूवारी रोजी करण्यात आले. या महोत्सवात प्रबोधनात्मक व प्रतिभा प्रोत्साहन कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व भारतीय संविधान उद्देशिकेच्या वाचनाने झाली. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालती किन्नाके (आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या, गोंदिया) होत्या, तर उद्घाटन छबू उके (जिल्हा परिषद सदस्य, गोंदिया) यांनी केले.

कार्यक्रमासाठी वंदना वनकर (अध्यक्ष, सत्यशोधक महिला महासंघ), ऍड. एकता गनविर (जिल्हा सत्र न्यायालय, गोंदिया) या प्रमुख मार्गदर्शक होत्या. तसेच, विशेष अतिथी म्हणून डॉ. स्नेहा गौरे, शिक्षिका वर्षा राऊत आणि संध्या पटले (मां. वि. म.) उपस्थित होते.

प्रमुख वक्त्यांनी “ती लढली म्हणून आम्ही स्वाभिमानाने जगतो” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी महिलांच्या हक्क, शिक्षण आणि समाजातील योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, व्यंजन स्पर्धा, गीत गायन आणि समूह नृत्य असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या शिंगाडे, रजनी मेश्राम, आम्रपाली राऊत, अरुणा हुमणे, हेमलता डोंगरे, निरु फुले, डीलेश्र्वरी कोरे, जोसना शहारे, निलिमा वाघमारे, शालू कोटांगले, दिक्षा बडोले, रोहिणी रामटेके तसेच संविधान बचत गट, गौतमी बचत गट, प्रगती बचत गट यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या शिंगाडे यांनी केले, तर आभार रजनी मेश्राम यांनी मानले.
संयुक्त जयंती महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

Previous article“देवदूत” संतोष पुंडकर: तत्परतेमुळे महामार्गावर मोठी जीवितहानी टळली..!
Next articleशिशु विहार शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न