देसाईगंज /प्रतिनिधी
मोजा-चोप येथे जय माता दी क्रिकेट क्लब चोप यांच्या सौजन्याने भव्य डे-नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा (शार्टपिच) चे आयोजन दिनांकः-१२/२/२०२५ बुधवार पासुन करण्यात आले आहे. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी चोप येथे टिकारामजी रामाजी गायकवाड यांच्या भव्य आवारात आयोजित क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील विविध गावातील खेळाडूंनी सहभाग घेतला असून सदर उद्घाटनिय कार्यक्रमाला आत्मारामजी सुर्यवंशी,राधेश्यामजी बरय्या,नानाभाऊ नाकाडे,लिलेश्वरजी पर्वते,प्रकाशजी डोंगरवार सर, आदी मान्यवर उपस्थित होते.

