महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचा 12 वी पेपर तपासणीवर बहिष्कार

0
263

14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी जोपर्यंत शासन करणार नाही तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात 12 वी च्या पेपर तपासणीवर बहिष्कार :- रत्नाकर माळी

शिक्षकांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा 10 ऑक्टोबर च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला व त्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला,परंतु 4 महिने झाले तरी अध्याप ही शासन हालचाल करताना करीत नाही खरे तर हिवाळी अधिवेशनात याचा निधी मंजूर होणे आवश्यक होते, परंतु राज्य सरकारने वेळकाढूपणा केला,

पण येणाऱ्या मार्च च्या अधिवेशनात 14 ऑक्टोबर च्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर होणे आवश्यक आहे यासाठी राज्यभरात सर्वच विधानसभा व विधानपरिषद यांच्या मधील आमदारांनी तशी पत्रे सरकारला दिली आहेत,गेल्या 25 वर्षांपासून शिक्षक उपाशीपोटी राबतोय पण शासनाला दिसत नाही.आम्ही फक्त समाज घडवायचा का ? आम्ही खायचे काय ?आमची कुटूंबे जगवणार कशी ? एवढे होऊन ही हक्काच्या वेतनासाठी आम्हीच रस्त्यावर उतरून झगडावे लागत आहे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही,त्यामुळे जोपर्यंत 14 ऑक्टोबर ची अंमलबजावणी शासन करीत नाही तोपर्यंत इ 12 वीच्या पेपर तपासणी वर आमचा बहिष्कार कायम राहील.याबाबत आम्ही प्रशासनाला 20 जानेवारी 2024 लेखी कळविले होते जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत व 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तर इ 12 वी च्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला जाईल संबंधित प्रशासनाने ही याकडे दुर्लक्ष केले.हा बहिष्कार संपूर्ण राज्यात जाईल कोणतेही पेपर सोडवून घेतले जाणार नाहीत व तपासले ही जाणार नाहीत शासनास आमची नम्रपणे विनंती आहे की, 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत, याबाबत कोल्हापूर, सांगली,सातारा, रत्नागिरी, सिधुदुर्ग, गडचिरोली हे सर्व जिल्हे सहभागी झाले आहेत. उर्वरित सर्व महाराष्ट्रात बहिष्कार टाकला जाईल. असे कृती समितीचे उच्च माध्यमिक चे विभागीय अध्यक्ष श्री रत्नाकर माळी यांनी सांगितले यावेळी राज्य निमंत्रक संजय लश्करे सचिव डॉ.चंद्रकांत बागणे, जिल्हाध्यक्ष भारत शिरगावकर,जयसिंग जाधव यासह अनेक शिक्षक उपस्थित होते…अशी माहिती विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिलेली आहे…

[राज्य सरकारने आमची फसवणूक न करता 14 ऑक्टोबर 2024 चा शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी व येणाऱ्या अधिवेशनात त्याची तरतूद करण्यात यावी… निर्णय लवकरात लवकर न घेतल्यास इयत्ता 10 वी च्या परीक्षेच्या पेपर तपासणीवर आम्ही ही बहिष्कार टाकणार…]

श्रीकांत कोकुलवार

विभागीय सहसचिव, नागपूर विभागीय कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती…

Previous articleशेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना – तातडीने ‘फार्मर आयडी’ काढा.!
Next articleनियमांचे काटेकोरपणे पालन करा- राजेंद्र केसरकर