जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
शेकडोंच्या संख्येने वाहन चालकाचा सहभाग
गोंदिया, दि. १४ : शिव उद्योग संघटना व एवरेस्ट फ्लीट कंपनी सलग्न वनामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हास्तरीय चारचाकी परवाना धारक रोजगार मेळावा आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर मुख्य अतिथी म्हणून प्रविण डांगे पोलिस निरीक्षक देवरी, शाखा व्यवस्थापक योगेश चौधरी, शिल्पा बांते जिल्हाध्यक्ष वनामी फाउंडेशन गोंदिया, एवरेस्ट फ्लीट कंपनी सहायक काबंळी हे उपस्थित होते. रोजगार मेळाव्याचे मुख्य उद्देश एवरेस्ट कंपनीचे सहायकानी विषद केला. महिलासाठी शिल्पा बांते यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी वनामी फाउंडेशन कटिबध्द असल्याचे सांगितले. महिलांनी उद्योग व रोजगार अशा विविध उपक्रमांचा लाभ महिलांनी घेण्यासाठी आवाहन केले. कंपनीला जोडल्या गेल्यास त्यांना होणारा आर्थिक फायदा याबद्दल माहिती दिली.
रस्ते अपघात कमी व्हावे, रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून शासनाने १५ जानेवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत निर्णय घेतला आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी केसरकर यांनी केले.
जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याला शेकडोंच्या संख्येने वाहन चालक उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अनेकांनी नाव नोंदविले.
कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी वनामी फाउंडेशन चे पदाधिकारी युवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष खरोले, पत्रकार विलास चाकाटे, पत्रकार मोहसीन अन्सारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

