गौमातेचा गौरव आणि गोसेवेचे व्रत घ्यावे – मा. खा. अशोक नेते

0
497

सुरभि गौसेवा समिती आमगावच्या वार्षिकोत्सव सोहळ्याची गौरवगाथा…

गौशाळेच्या सेडसाठी मा. खा. अशोक नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर !

आमगाव  : येथील सुरभि गौसेवा समिती द्वारा संचालित “श्रीमती महादेवी रामचंद्र गुप्ता गौशाळेचा वार्षिकोत्सव आणि गौकक्ष लोकार्पण सोहळा” (किडंगीपार) दि.१६ फेब्रूवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. गौसंवर्धन आणि भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या या सोहळ्यास विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

गौमातेचा गौरव आणि सेवेसाठी संकल्प – मा. खा. अशोक नेते : 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.खा. अशोक नेते (माजी खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री) यांच्या हस्ते झाले. यावेळी प. पू. संत ज्ञानीदास महात्यागी (तिरखेडी आश्रम), मा. नंदकिशोर अग्रवाल (गौपालक, डोंगरगड), मा. संजय पुराम  (आमदार, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र), मा. संजय अग्रवाल (परमाका एजन्सी, गोंदिया)प्रा. इंजी. सुभाष आकरे, (सचिव ,सुरभि गौसेवा समिति आमगांव) तसेच सुरभि गौसेवा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मा. खा. अशोक नेते यांनी गौसेवेचे महत्त्व विशद करत प्रत्येकाने गोसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले,
“गौमाता ही केवळ पशू नसून, ती संपूर्ण राष्ट्राची राज्यमाता आहे. गौसेवा म्हणजेच संस्कृतीची सेवा आहे. पवित्र गंगाजल कलश कुंभमेळा प्रयागराज येथून या सुरभि गौशाळेत आणल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. या गौशाळेच्या विकासासाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर केले असून, यातून आधुनिक सेड उभारणीस मदत होईल, ज्यामुळे गोसंवर्धन अधिक प्रभावी होईल.”

तसेच त्यांनी गौसंवर्धन व संरक्षणाच्या गरजेवर भर देत श्रीकृष्णाच्या गोसेवेच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख केला.

गौसंवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन :

यावेळी प. पू. संत ज्ञानीदास महात्यागी (तिरखेडी आश्रम) यांनी गौसंवर्धन आणि गोसेवेचे व्रत घेण्याचे आवाहन करत “गौमाता ही केवळ धार्मिक आस्थेचा भाग नसून पर्यावरण आणि मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, सुरभि गौसेवा समितीचे अध्यक्ष गोकुलदास फाफट, कोषाध्यक्ष देवकीनंदन अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, नरेंद्र वाजपेयी आणि समितीच्या संचालक मंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

गौमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. उपस्थित मान्यवरांनी गौसंवर्धन आणि गोसेवेसाठी योगदान देण्याचा संकल्प घेतला.