द कॉम्बॅट अकादमीच्या खेळाडूंची वुशू स्पर्धेत पदकांची लयलूट

0
120

तिरोडा/पोमेश राहांगडाले

नागपूर वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजित १० व्या नागपूर फेडरेशन वुशू चॅम्पियनशिप स्पर्धेत द कॉम्बॅट अकादमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्यपदके पटकावली. नागपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अकादमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली.

स्पर्धेत जयांश सचिन ढबाले, रियांश भवानीप्रसाद बसोने, आरोहण नविन झरारिया, कु. माही संजय पारधी, यश विजय जांभुळकर आणि यश नितीन उईके यांनी सुवर्णपदके पटकावली. तर आराध्य शिंगेश ढबाले आणि कु. समीक्षा प्रभु चौधरी यांनी रौप्यपदके मिळवली.

या खेळाडूंना प्रशिक्षक दर्शन येरपुडे, मोहित यादव आणि प्रथम सोनकावडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी उत्तम खेळ दाखवत स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले.

या यशाबद्दल  संजय नागपुरे, वीकेश मेश्राम, चंद्रप्रकाश प्रजापती, आकाश शहारे, अंकुश बोहने आणि अमन नंदेश्वर यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. तसेच गोंदिया जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीनेही विजेत्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या स्पर्धेतल्या यशामुळे द कॉम्बॅट अकादमीच्या खेळाडूंचे आत्मविश्वास वाढला असून, भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ते दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous articleतिरोडाच्या अदिती बैसने रचला इतिहास – सात सुवर्णपदकांसह महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत सर्वोच्च यश
Next articlePM-किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला मिळणार