खासदार प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार

0
74

मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, गोंदिया येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन

गोंदिया –मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (बी. फार्म.), गोंदिया येथे खासदार  प्रफुल पटेल आणि सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार तथा संस्था सचिव  राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी खासदार  प्रफुल पटेल आणि सौ. वर्षाताई पटेल यांना उत्तम आरोग्य, निरोगी व दीर्घायुष्य जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

रक्तदान शिबिर बाई गंगाबाई ब्लड बँकच्या चमूच्या सहकार्याने पार पडले. संस्था संचालक  निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला विशेष यश लाभले. या रक्तदान शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हिमांशी गवळ, पूनम चौधरी, सई रंगलानी, राहुल चौधरी, दीपेश वाधवानी, वैभव गर्ग, अधिकार अग्रवाल, आदित्य मंडल, विनय दुबे, दीप अग्रवाल, नकुल झिंगरे, आयुषी पटेल, तुषार अग्रवाल, शिवानी गुप्ता, मिष्टी वाजपेयी, सुषमा राऊत, हर्ष सयाम, मयूर गायधने, मुकुल बिसेन, निष्ठा शहा, रुकसार खान यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

कार्यक्रमात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा माजी आमदार तथा संस्था सचिव  राजेंद्र जैन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास मनीषा मिश्रा, सुनील चौधरी, अजय डोंगरवार, प्रतिमा हरिणखेडे, राजकुमार बसंतवानी, विद्याधर मुळे, भजेंद्रकुमार जैतवार, चंद्रनारायण पांडे, रीना मस्करे, प्रलय बाऱ्हेवार, राहुल चौधरी, गोपेश बाजपेयी, रौनक ठाकुर तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले व रक्तदान हे जीवनदान असल्याचे सांगत अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.