रोगनिदान व रक्तदान शिबिर, बचत गट मेळावा, शेतकरी मेळावा आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम
गोरेगाव : तिमेझरी येथील वरिष्ठ जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात मा. खा. प्रफुल पटेल, सौ. वर्षाताई पटेल व सौ. शारदा राजेश पटले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादी काँग्रेस गोरेगाव तालुका अध्यक्ष श्री. केवल बघेले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमात जनतेच्या आरोग्यासाठी भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट मेळावा व स्टॉल प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. तसेच अपंगांसाठी साहित्य वाटप, बचत गट व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधवाटप करण्यात आले.
आरोग्य शिबिराला रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलसह ग्रामीण रुग्णालय व के.टी.एस. हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सहकार्य केले. शिबिरात डॉ. वज्रा पुष्पराज गिरी, डॉ. पुष्पराज गिरी, डॉ. चंद्रशेखर राणा, डॉ. किशन टकरानी, डॉ. विवेक हरिणखेडे, डॉ. नितीन ठिकरे, डॉ. रंजित खरोले, डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. निकिता कनोजे, डॉ. धर्मेंद्र टेम्भरे, डॉ. आनंद कटरे, डॉ. रितेश कटरे, डॉ. दीपक हरिणखेडे, डॉ. कार्तिक हिंदुजा, डॉ. विनय अंबुले, डॉ. मीनल चोरवाडे, डॉ. रिनेश मेश्राम यांनी महत्त्वपूर्ण सेवा दिली.
कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र जैन, सुरेश हर्षे, पन्नालाल बोपचे, केवल बघेले, दिगंबर बोपचे, सुशांत बोपचे, देवेंद्र ठाकरे, अनिल मडावी, गणेश बघेले, सुनील कापसे, घनेश्वर तिरेले, भोजराज चव्हाण, खुशाल वैद्य, रविकांत लांजेवार, प्रल्हाद वडगाये, भूपेश गौतम, कुवरलाल भोयर, अंबुले सर, भगत सौ. मायाताई चव्हाण, सौ. डिलेश्वरी तीरेले, सौ. लीलाबाई बघेले, जगदीश बघेले, श्री. गोविंद पटले, श्री. नानूजी कटरे, माणिक हरिणखेडे यांसह शेतकरी, उमेद कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात योगदान दिलेल्या डॉक्टरांचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

