“काँग्रेस सोडून जाणारा भटकतच राहिला” – माजी आमदार दिलीप बन्सोड
आमगाव : “काँग्रेस पक्ष सत्तेत नसला तरी मी सध्याचा खासदार आहे. कोणतीही समस्या असेल तरी कार्यकर्त्यांनी घाबरू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागावे. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे प्रतिपादन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी केले.
गोंदिया रोडवरील चंद्रा लॉन्स येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार दिलीप भाऊ बन्सोड होते.
काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष – माजी आमदार दिलीप बन्सोड : बैठकीत मार्गदर्शन करताना माजी आमदार दिलीप बन्सोड म्हणाले, “काँग्रेस हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. अनेक नेते स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले आणि परत आले, पण जे सोडून गेले ते भटकत राहिले.”
माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, “काँग्रेस पक्षात मोठे झाल्यावर पक्षाशी गद्दारी करणारे काही नेते स्वार्थासाठी आणि आमदार होण्याच्या इच्छेने इतर पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.”
त्यांनी असा आरोप केला की, काही नेते काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रलोभने देऊन आपल्या पक्षात सामील होण्यासाठी आग्रह करत आहेत. मात्र काँग्रेस कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाहीत, त्यामुळे कोरोटे यांची मनसा पूर्ण होणार नाही.
त्याचबरोबर, आगामी परिसीमनामुळे आमगाव विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी गोंदिया सौ. वंदनाताई काळे,काँग्रेस जिल्हा सचिव इसुलाल भालेकर ,जिल्हा परिषद सदस्य सौ. उषा मेंढे,जिल्हा परिषद सदस्य सौ. छबू उके,जिल्हा काँग्रेस कोषाध्यक्ष बन्सीधर अग्रवाल,संपतलाल सोनी,जिल्हाध्यक्ष सेवा दल जमील खान पठाण,गोंदिया काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बापू अग्रवाल,तालुका काँग्रेस कमिटी आमगाव अध्यक्ष संजय बहेकार ,शहर काँग्रेस कमिटी आमगाव अध्यक्ष देवकांत बहेकार आदि मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत तालुका काँग्रेस सेवा दल अध्यक्ष राधेलाल रहांगडाले,वाय. सी. भोयर,युवा नेते दुष्यंत किरसान
,पं. स. सदस्य नंदु कोरे, हिदेंद्रनाथ ठाकुर,बाबू मेंढे, विजय देशमुख, अभय ढेंगे, बब्बु बिसेन, पी. सी. कटरे, प्रमोद वंजारी, संजय डोये, गणेश हुकरे, रामेश्वर शामकुवर, पिंकेश शेंडे, राजेश मच्छीरके, प्रशांत रावते, संतोष शतिशहारे, सुनिल मोटघरे, रामदास गायधने, रवी रहांगडाले, रितेश चुटे, मुकेश अग्रवाल, बाबुराव कोरे,महिला कार्यकर्त्या सौ. सुनंदा येरणे, सौ. सकुन कटरे, सरपंच सौ. पटले काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचे संचालन जगदीश चटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन भोजराज जैतवार यांनी मानले.
ही बैठक काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वाची ठरली असून, आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी अधिक कार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.

