विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना, सालेकसा येथे महत्वपूर्ण सभा संपन्न
सालेकसा : जिल्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना, गोंदिया च्या वतीने डोमाजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली व सुभाष आकरे (अध्यक्ष, जिल्हा सहकारी बोर्ड), खुमेश कटरे (अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बोरकन्हार), बी.बी.बिसेन, अध्यक्ष वि वि का से से संस्था सीतेपार यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण सभा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येथे संपन्न झाली. या सभेत संस्थांचे भाग भांडवल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कर्जात जमा करण्याच्या आदेशाविरुद्ध लढा देणे या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी डोमाजी बोपचे (जिल्हाध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संघटना), सुभाष आकरे (अध्यक्ष, जिल्हा सहकारी बोर्ड), खुमेश कटरे (अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, बोरकन्हार), प्यारेलाल गौतम (अध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, तिल्ली मोहगाव) आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
सभेत बाबूलाल उपराडे (अध्यक्ष, धान गिरणी, सालेकसा), गुमान सिंह उपराडे (तालुकाध्यक्ष, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सालेकसा), सावलराम बहेकार, नागपुरे सर (माजी नायब तहसीलदार) यांच्यासह तालुक्यातील 118 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते.
सभेच्या माध्यमातून संस्थांचे भाग भांडवल बँकेच्या कर्जात जमा करण्याच्या आदेशाविरुद्ध एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच सहकारी संस्थांचे हक्क आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी पुढील रणनीती ठरवण्यात आली.

