छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
73

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सूर्याटोला येथे अभिवादन सोहळा; माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

गोंदिया, १९ फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सूर्याटोला (गोंदिया) येथे आयोजित या कार्यक्रमात माजी आमदार राजेंद्र जैन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी उपस्थितांना शिव जयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. “छत्रपती शिवरायांचे आदर्श हेच आपल्या कार्याचा मार्गदर्शक असायला हवेत. स्वाभिमान, पराक्रम आणि प्रजेविषयी असलेली कळकळ ही शिकण्यासारखी आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात आर्चिड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरतेवर शौर्य गाथा सादर केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

या अभिवादन सोहळ्याला राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, नानू मुदलियार, केतन तुरकर, विनीत सहारे, सुनील पटले, शैलेश वासनिक, अनुज जैस्वाल, राजेश दवे, नागों बंसोड, करण टेकाम, पंकज चौधरी, लिकेश चिखलोंडे, प्रशांत सोनपुरे, लव माटे, शोहनलाल गौतम, हर्षवर्धन मेश्राम, श्रेयस खोब्रागडे, सरिता ब्रह्मे, उमा सिंग, पुष्पा मेश्राम, विजया उके, योगिता डोंगरे, संदीप बोरकर, धनलाल राहंगडाले, बहादुर कटरे, किसन वाडवे, दामोदर राहंगडाले, अरुण तुपकर, आकाश वाडवे, भूषण पाटील, टीनू खंडारे, भजन सुखदेवे, यश खोब्रागडे, सार्थक बोरकर, अमन घोडीचोर, तुषार उके, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, हर्षवर्धन मेश्राम, रमाकांत मेश्राम, रौनक ठाकूर, दिलीप डोंगरे, प्रकाश बर्रैया, मंगेश रंगारी, शरभ मिश्रा, वामन गेडाम यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांनुसार कार्य करणे आणि त्यांच्या स्वराज्य संकल्पनेनुसार समाजहिताचे कार्य करणे हाच खरा अभिवादनाचा मार्ग असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Previous articleसहकारी संस्थांच्या भांडवल हस्तांतरणाविरोधात लढ्याचा निर्धार
Next articleचोरीचा छडा ! – आमगाव पोलिसांनी जप्त केले ₹८०,०००