तिरोडा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तालुका पत्रकार संघ, तिरोडाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन केले.
कार्यक्रमाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, मार्गदर्शक यांच्यासह संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यांच्या पराक्रमाची व दूरदृष्टीची आठवण ठेवून समाजासाठी प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

