श्री पब्लिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
65
तिरोडा – श्री पब्लिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परिपाठानंतर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी शाळेचे संचालक मा. रामकृष्ण शेंडे सर, मुख्याध्यापक राधाकृष्ण शेंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याध्यापक सरांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेबद्दल माहिती दिली, तर संचालक सरांनी त्यांच्या बालपण आणि इतिहासावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. संगीता ठवकर मॅडम यांनी शिस्तीचे पालन आणि मातृभूमीच्या मुक्तीसाठी महाराजांनी केलेल्या संघर्षाची महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन पौर्णिमा कनपटे मॅडम यांनी केले.

Previous articleतालुका पत्रकार संघाने छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन
Next articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माल्ही येथे गट्टू कार्य व वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न