शिक्षणाच्या सुविधा विस्तारासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
तिरोडा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माल्ही येथे गट्टू कार्य आणि नवीन वर्गखोलीच्या बांधकामासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य सौ. तुमेश्वरी ताई बघेले यांच्या हस्ते पार पडला.
भूमिपूजन सोहळ्याला पंचायत समितीचे सभापती श्री. तेजरामजी चौहान, पंचायत समिती सदस्य जे. पी. पटले, ग्रामपंचायत सरपंच शालिंद्रजी पटले, उपसरपंच वंदना ताई गजभिये तसेच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नवीन वर्गखोलीच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार आहे. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

