तुमसर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

0
52

प्रतिनिधी/ सतीश पटले 

 तुमसर- छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर च्या वतीने स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त “शिवजन्मोत्सव सोहळा 2025” अंतर्गत विविध संस्कृतीशील व नेत्रदीपक अशा कार्यक्रमांच्या आयोजनातून छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान, तुमसर करवी महाराजांची जयंती, तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यात पोलिस स्टेशन तुमसर अणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्तिक आयोजनातून दिनांक 16/02/2025 रोज रविवारला पहाटे 6.00 वाजता ‘शिवस्फूर्ती’ महामॅरेथॉन, 17/02/2025 सोमवारला सायं. 7.00 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, व दिनांक 18/02/2025 रोज बुधवारला भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘क्लिक टू क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड नागपूर’ श्री प्रशांत मिश्रा यांच्या सहयोगातून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्म्यांचे वितरण, रक्तदान शिबिर तर मोफत बीपी, शुगर, थायरॉईड, दंत तपासणी करण्यात आली. दुपारून गडकिल्ले बनवा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आले तर सायं. 7.00 वा. आजकालच्या समाजातील वाईट घटनांचे दर्शन घडविणाऱ्या प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी स्वतः तयार करून उत्कृष्ट अभिनयातून *”प्राणघातक “* अजब तुझा न्याय देवा या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. दिनांक 19/02/2024 रोज बुधवार ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव अंतर्गत पहाटे 6.00 वा. कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या, व अनेकांच्या उपस्थितीत पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पपणानंतर महाराजांची गारद व आरती झाली. महाराजांचे तेज अबाधित राहो या भावनेतून भव्य मशाल प्रज्वलन करून संपूर्ण शहर भ्रमण करण्यात आले. यावेळी विविध नागरिकांच्या सहभागाने या मशाल सोहळ्याला भव्य रॅलीचे स्वरूप आले होते त्यानंतर दुपारी 2.00 वाजता श्यामसुंदर सेलिब्रेशन हॉल तुमसर येथे महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण तसेच पाळणा गीत गायन करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामकृष्ण तितरमारे सुभेदार मेजर, मा. मीराताई भट,व अंकुशजी राऊत, शुभम पारधी, बादल गडपायले, विरेंद्रजी गौतम, शिव हाडगे, सेलोकर सर, मनिषताई मेश्राम मान्यवरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात प्रस्तुत कार्यक्रम बक्षीस वितरण व महाप्रसादा नंतर साय. 6.00 वा. भव्य व नेत्रदीपक अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले यात प्रामुख्याने महाराजांची पालखी,शेतकरी राजा व सजावट केलेल्या बैलगाडीचे आकर्षकता, पारंपरिक खेळ लेझीम, दांडपट्टा यासारख्या महाराष्ट्रीयन संस्कृतीला केंद्रभूत करून व शहरातील जनता विद्यालय व कस्तुरबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध महाराजांच्या चरित्रावर आधारित अशी नृत्यआविष्कार सादर करण्यात आली. शोभायात्रेतील महाराजांच्या वेशभूषेतील प्रतिरूप महाराज असलेली झाकी बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटवनारी होती या प्रसंगी पोलीस स्टेशन तुमसर चे श्री. संजय गायकवाड पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन तुमसर, व उपस्थित पोलिस बांधवांच्या सहयोगाने हि भव्य दिव्यअशी शोभायात्रा निर्विघ्नपणे पार पडली. छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक/अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठान चे मार्गदर्शक सचिव प्रा.अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवने, कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, प्रशांत वासनिक, अंकुश गभने, नितीन सार्वे, हाऊसिलाल ठाकरे, सुमित जिभकाटे, मनोज बोपचे, मयूर पुडके, गीतेश गणोरकर, सहील धार्मिक, अंकित तुमसरे, सतिश दमाहे, नितीन दमाहे, अक्षय दमाहे, भूषण पडोळे, आकाश बारसागडे, तेजस, युवणेश धांडे, प्रवीण धांडे, श्रीरंग, कविलाश फुंड, विवेक ठाकरे, निखिल आथीलकर, मोसम वानखेडे, तुषार बागडे, कुणाल भोयर, दिपाली मते, साक्षी चन्ने, सायली मोहतूरे, पूजा सिंगणजुडे, गुंजन ढबाले, खुशी भोयर, ज्योती हेडाऊ, दामिनी धुमनखेडे, लीना भुजाडे, लक्ष्मी शेंडे, व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने “शीवजन्मोत्सव सोहळा 2025” यशस्वीरित्या संपन्न झाला.

Previous articleखनिज निधीतील 162 कोटींच्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती
Next articleक्रूर नियतीचा घात! वडिलांचा मृतदेह घरी, मुलाने आधी दिली दहावीची परीक्षा, नंतर अंत्यसंस्कार