मार्कन्डा येथे२६ फरवरी बुधवार पासून यात्रेस प्रारंभ
प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले
चामोशी तालुक्यातील अवघ्या ५ कि . मि . अंतरावर असलेले विर्दर्भाचे खजुराहो मंदिर तसेच विर्दभार्चे काशी म्हणून ओळखणाऱ्या जाणाऱ्या मार्कंन्डा देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा१० दिवसाची यात्रेला सुरुवात २६ फरवरी म्हणजेच बुधवार पासून सुरवात होत आहे . इथे गडचिरोर्ली जिल्ह्याच्या शिमेलगत असलेल्या छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाना, राज्यातले व गोंदिया, भंडारा, चद्रपूर, नागपूर, या जिल्हयातले शिवभक्त भाविक येत असतात . ही यात्रा१० ते१२ दिवस चाललेली असतो, त्या निमित्याने मार्कन्डा देवस्थान स्टस् चे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परीशधेत म्हटले आहेत . यावेळी मार्कन्डा देवस्थान स्टस्ट् चे अध्यक्ष गजानन भांडेकर, तसेच सचिव मृत्युंजय गायकवाड व सहसचिव रामुजी तिवाडे यांनी म्हटले 24 तारीख सोमवारला , मुलचे शिव शरण सारडा व विश्राम जी हुकुम या दोन्ही जोडप्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गंगापुजन चे काम करतात . व दि२६ बुधवारला पारंभी पुजेचे आयोजन सकाळी४ वा . ग . जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच म . मुख्यमंत्री देवन्द्र फडणवीस, ग .खा . मारोतराव कोवासे, ग . आ . डॉ मिलिंद नरोटे, गुरव पुजारी पंकज व पत्नी शुभांगी पांडे यांच्या हस्ते करण्यात आले आहेत . तसेच मार्कंडा देवस्थान येथे येणाऱ्या शिवभक्त भाविकांना उन लागू नये म्हणून पेंडाल तसेच पाणि व भाविकांसाठी कपडी मंठ्यांची व्यवस्था, स्तनदा माता, जेष्ट नागरिक, यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांसाठी रांगेत दर्शन घेण्यासाठी कठडयांची व्यवस्था तसेच सी . सी .टी .वी . कॅमेरे प्रसारण करण्यात आले आहेत . मंदिर दर्शन सकाळी६ ते१२ वा . ठेवण्यात आले आहेत .तसेच पहिल्या दिवशी साबुदाना खिचडी आणि दुसऱ्या दिवशी पासून तिरुपती पॅटन प्रमाणे लेमन राईस असे नाश्याची व्यवस्था मार्कन्डा देवस्थान स्टस्ट्र च्या वतीने ठेवण्यात आले आहेत . त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी टिपूर वाजण्याचे कार्यक्रम आणि पाचव्या दिवशी दरवर्षी प्रमाणे अतुल गण्यारपवार व त्यांची पत्नी साधना गण्यारपवार समारोपी पूज्या करतात . तसेच दरवर्षी ही यात्रा 10 वाजेपर्यंत होती तर यावर्षी ही यात्रा12 वाजे पर्यंत राहील .

