शिक्षण सेवक योजना व 15 मार्चचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया तर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना शिक्षण सेवक योजना रद्द करावी सोबतच 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करण्यासंदर्भातली निवेदन जिल्हाध्यक्ष संदीप तिडके यांचे नेतृत्वात देण्यात आले
15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या संचमान्यतेमध्ये हजारो पदे जिल्हा परिषद शाळेमधील अतिरिक्त ठरत असून शाळा बंद पडून गोरगरिबांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण सेवक योजना सध्या परिस्थितीत उशिरा लागलेल्या शिक्षकांना आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणणारी असल्यामुळे संचमान्य ते संदर्भातला शासन निर्णय व शिक्षण सेवक योजना बंद करावी यासह विवीध प्रमुख मागण्याचे निवेदन शिक्षक समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली असता राज्याची उपमुख्यमंत्री महोदय यांनी मुंबई येथे सचिवस्तरीय सभा आयोजित करून मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आवश्यक ते सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदनात शिक्षण सेवक योजना रद्द करणे, 15 मार्च 2024 च्या शासन निर्णय रद्द करून जुन्याच शासन निर्णयानुसार संच मान्यता नव्याने अद्यावत करणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक बांधवांचा तीन दिवसाचा संप कालीन वेतन अदा करणे,मुख्यालयाची अट शिथिल करणे, सरसकट पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ देणे,रिक्त पदांवर शिक्षकांची लवकर भरती करणे, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करणे, जीर्ण झालेल्या इमारतींकरता निधी उपलब्ध करून देणे, स्वयंपाकिन,मदतनिसांच्या मानधनात वाढ करणे, 10 ,20, 30 ची आश्वासित प्रगती योजना लागू करणे,आंतरजिल्हा बदली शिक्षकांची सेवा जेष्ठता गृहीत धरने ,शिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढून अवास्तव प्रशिक्षण बंद करणे,विनाअट उच्च प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापकाची नेमणूक करणे,शिक्षण सेवक कालावधी मधील तीन वेतनवाढ लागू करणे या मागण्याचा समावेश होता. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी भेट घालून सविस्तर शिक्षक मागण्या संदर्भात चर्चा घडवून आणल्याबद्दल सन्माननीय माजी आमदार सहसराम कोरोटे यांचे शिक्षक समितीने आभार मानले
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, सतीश दमाहे, गजानन पाटणकर,तालुका सरचिटणीस मिथुन चव्हाण, जिल्हा परिषदे प्रमुख बी एस केसाळे, तालुकाध्यक्ष शालिकसा पूर्णानंद ढेकवार ,ओमकार लील्हरे, जयस लिल्हारे, मुकेश गणवीर ,धीरज शहरे, कृष्णकुमार कुऱ्हाहे, रवी जाधव, किशोर ब्राह्मण,तेजराम नंदेश्वर , ए.एस. दुबे, र. एन सांगळे, डी.डी पवार, डी.जी. चव्हाण, एस.व्ही. चव्हाण, वाय. व्ही. वसाने, ए. एन. बान्नावडे, एस जी साळोख, डी. परिहार, आर एम खेडेकर, एच खरात, डी. वासनिक,एम. ही. भरपुरे, एस मोडवकर,ए. व्ही अधाव, एन जी बावने, जी. यो व. वसाने, जी. जी आमुगे, जी आर सूर्यवंशी, आर एच कोकने, टी. के गणविर, आवेद, सी. शेख, जी एल पाटील, एस. के. शेंडे, डी-एन राठोड, श्री. एफ. के अहमद, युडी नोळे, वाय व्हि. शिरवत, ई. डब्लू बेग, सुतार सर, नरम के चकाण, आर.एम नगरे, एन. डी मुसळे, के डी कुरथने, बालाजी नागरगोजे, शैलेश निघोट, जी जी सांगडे, वाय जी साने, ए – अनेकर, जी स्चि सोनवणे, दिनेश केवट, अडकिणे, किरण चेळेकर, पवन थिटे, सोै भगवर मॅडम, सौ जाधव मॅडम, सौ शिंद मॅडम, माडनुरे, कुमारी शितल खाडे,सौ रले मॅडम, सौ झोरे मॅडम, सौ चव्हाण मॅडम, तुषार पिलारे, अरुण बिलारे, आशिष खडारे, महेश कालवार, संजय कचळे, योगेश्वर गाढवे, सोपान गोरे, गणेश ङोईफोडे, डी.एस.वासनिक यासह बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते…

