पीएम श्री केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
आमगाव: पीएम श्री केंद्रीय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक ठाणा, तालुका आमगाव येथील विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्र, नागपूर येथे शैक्षणिक उपक्रम अंतर्गत भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विज्ञानाशी संबंधित विविध प्रयोग, संशोधन आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
रमण विज्ञान केंद्र, नागपूर हे कोलकाताच्या राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदचा एक घटक आहे, जो भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अधीन आहे. हे केंद्र नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईशी संलग्न असून विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी १९८९ मध्ये स्थापन करण्यात आले. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रमण यांचे नागपूरमधील महालेखापरीक्षक कार्यालयाशी असलेले संबंध लक्षात घेऊन या केंद्राला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
यावेळी केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध शोध, प्रयोग व नवसंशोधनाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपकरणे, प्रयोगशाळा आणि सजीव व निर्जीव विज्ञानविषयक माहिती जाणून घेतली.
या शैक्षणिक सहलीत शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक एन. एस. कोरे, तसेच शिक्षक जी. बी. पटले, बापूसाहेब गुंडे, गीता पंधरे, अनिता मानकर, स्नेहा रामटेके, नंदकुमार जिभकाटे, सत्यवान कटरे, सुरजलाल चौधरी आणि स्वयंसेवक प्रीती गोंडाणे, प्रियंका केवट, सविता बेंदवार, फेकणताई भगत, देवेश्वरी बागडे, बेबीताई केवट यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांसाठी ही सहल प्रेरणादायी ठरली असून विज्ञान क्षेत्रातील नवीन संशोधन व प्रयोगांविषयी त्यांना सखोल माहिती मिळाली.

