शेतकऱ्यांचे वीज संकट जनकल्याण फाउंडेशनचा पुढाकार

0
208

कालीमाटी सबस्टेशनचा दाब वाढविण्याची गरज

 रब्बी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीचे उपाय हवे

 अभियंत्यांशी चर्चा लवकरच उपाययोजना

शेतकरी संघटनेचा लढा कायम

आमगाव : तालुक्यातील कालीमाती येथील विद्युत सबस्टेशनची क्षमता वाढविण्याची मागणी भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या किसान आघाडीमार्फत करण्यात आली. या संदर्भात शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता अभिजित भांडारकर यांची भेट घेऊन साकडे घातले.

कालीमाती सबस्टेशनमधील कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातील विद्युत पंपांसाठी आवश्यक वीज मिळत नाही. परिणामी, रब्बी हंगामातील पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या समस्येची दखल घेत भारतीय जनकल्याण फाउंडेशनच्या किसान आघाडीने हा प्रश्न उचलून धरला.

यावेळी कार्यकारी अभियंता अभिजित भांडारकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच सबस्टेशनमधील दाब वाढविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील नुकसान टाळण्यासाठी आणि विद्युत पंपांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, याकरिता वीज वितरण विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी भारतीय जनकल्याण फाउंडेशनचे यशवंत मानकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हुकूमभाऊ बोहरे,उत्तम नंदेश्वर, मेघश्याम भाऊ मेंढे, नंदकिशोर खोब्रागडे, नरेंद्र ठाकूर, किरण रहांगडाले, राधेलाल चुटे, बेनिराम कटरे,सरपंच कैलास बिसेन, कमलेश मेश्राम, मिलिंद मेश्राम, मोदी बिसेन आदि  शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्वाही वीज विभागाने दिली आहे.

Previous articleविद्यार्थ्यांनी घेतले विज्ञानाचे धडे रमण विज्ञान केंद्रात
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती गठीत