आमगाव येथे सहविचार सभेत एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड
आमगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, राजयोग कॉलनी, आमगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२५ साजरा करण्यासाठी सहविचार सभेचे आयोजन २२ फेब्रुवारी, शनिवार रोजी करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी विश्वजित गणवीर होते.
या प्रसंगी आमगाव नगरातील विविध वार्डांमधून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. सभेमध्ये १४ एप्रिल २०२५ रोजी सार्वजनिक जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यकारिणी गठित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
नवीन कार्यकारिणीची निवड
सहविचार सभेत अध्यक्ष पिंकेश शेंडे,उपाध्यक्ष विलास मेश्राम आणि ज्योत्सना शहारे,महासचिव प्रशांत रावते,सहसचिव संजय डोंगरे, मेघाताई टेंभुर्णीकर,महेंद्र मेश्राम,कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे यांची एकमताने कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
सर्व समाजबांधवांच्या सहमतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती” गठीत करण्यात आली. समितीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि गौरवशाली पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सभा यशस्वी करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी मोलाचे योगदान दिले. पुढील नियोजनासाठी समिती लवकरच बैठक घेऊन कार्यवाही सुरू करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

