अहेरी,, दिनांक 26 फरवरी 2025 महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय माउंट आबू( राजस्थान)
शाखा अहेरीतर्फे मागील वर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा भारतातील बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन व चित्र प्रदर्शनी अहेरी जवळील वांगेपल्ली घाट जवळील शिव मंदिराच्या बाजूला ही भव्य प्रदर्शनी सुरू राहणार आहे
बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी होऊ शकेल
भारत फिरून बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन ज्यांना शक्य होत नाही त्या भाविकांसाठी एक चांगली व्यवस्था मागील वर्षांपासून करण्यात येत आहे तरी आपण सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकाने केली आहे

