माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
गोंदिया : तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काही कारणांमुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी केली आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतल्याने पक्ष संघटनेस अधिक बळ मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये तालुक्यातील विविध गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. रायपूर येथील माजी सरपंच आणि सेंट्रल कृषक संस्थेचे श्री केवल रहांगडाले, सेंट्रल कृषकचे संचालक श्री मंगल ठाकरे , पांढराबोडी येथील श्री योगराज लिल्हारे , दासगाव माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री अंचल गिरी ,ग्रामपंचायत सदस्य श्री राजेश भास्कर चौडे ,मुंडीपार (बटाना) येथील श्री विठ्ठलराव करडे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पार पडला. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे.
प्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय कार्य करत राहू.”
या प्रवेशामुळे गोंदिया तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत होणार असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत आणि अभिनंदन केले.

