शेतकऱ्यांच्या हक्काच्या भावासाठी आमगाव बाजार समितीचे प्रतिनिधी सक्रिय
आमगांव – राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद पुणे येथे संपन्न झाली. या परिषदेत महाराष्ट्राचे पणन मंत्री मा. जयकुमार रावल, कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे, तसेच विविध विभागांचे सचिव, संचालक आणि राज्यभरातील बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ उपस्थित होते.
या वेळी आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तम नंदेश्वर यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, तसेच बाजार समितीमध्ये येणाऱ्या विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले.
परिषदेत आमगाव बाजार समितीचे उपसभापती राजेश भक्तवर्ती, संचालक हुकूम बोहरे, संचालक सचिन अग्रवाल यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले बाजार समित्यांचे संचालक प्रतिनिधींनी देखील आपापल्या समस्यांवर चर्चा केली.
या परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील बाजार समित्यांना शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर धोरणे राबवण्याचा संकल्प करण्यात आला.

