देवेंद्र भोयर यांची उच्चतम कामगिरी

0
262

२३व्या नॅशनल पॅरा एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या दिव्यांगाच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेला भंडारा जिल्ह्यातील, लाखनी तालुक्यातील रेंगोळा गावचा देवेंद्र भोयर यांनी F-३६ या कॅटेगरीमध्ये गोळा फेक प्रकारात १०.७८ मीटर गोळा फेकत सिल्वर मेडल जिंकत आपल्या गावाचे आणि भंडारा जिल्ह्याचे नाव उज्वल केले. देवेंद्रची ही चौथी राष्ट्रीय स्पर्धा असून आता पर्यन्त त्याने एक सुवर्ण व एक रजत असे दोन राष्ट्रीय पदक मिळवले आहेत. चेन्नई मधील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या ६३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला 11 सुवर्ण, ३ रौप्य, १२ कांस्य असे एकूण २६ पदक मिळवत ५वे स्थान प्राप्त केले. त्यात देवेंद्रने अतिशय चांगले कामगिरी करत रजत पदक प्राप्त केले. त्याच्या या कामगिरीचे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात कौतुक होत असून त्याने आपल्या विजयाचे श्रेय महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे सर, तांबोळी सर, महाराष्ट्राचे टीम मॅनेजर विनायक सुतार सर, सत्यप्रकाश तिवारी सर, कोच राजेंद्र पवार सर आणि भंडारा जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू तसेच देवेंद्रचे कोच, मार्गदर्शक प्राध्यापक योगेश्वर घाटबांधे किटाडी आणि आई, वडील, बहीण व भाऊ तुषार भोयर यांना दिले आहे.