गोंदिया : तालुक्यातील शिवधाम, फुलचूर येथे आज २५ फेब्रूवारी रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने तिर्थक्षेत्र निधी अंतर्गत शिवधाम प्रवेश द्वाराचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आले. समाजकल्याण माजी सभापती सौ.पूजा अखिलेश सेठ यांच्या सतत पाठपुराव्यांमुळे ग्राम फुलचूर येथे शिवधाम प्रवेश द्वार मंजूर करण्यात आले. येणाऱ्या काळात फुलचूर व परिसराच्या प्रगती व विकासासाठी प्रयत्न करणार याची ग्वाही माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली व महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
लोकार्पण प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, पूजा अखिलेश सेठ, संजय टेभंरे, मिलन रामटेक्कर, राजेश चतुर, अखिलेश सेठ, स्नेहा गौतम, राजकुमार बघेले, माणिक तुरकर, रविकांताबाई नागपुरे, दुर्गाबाई राऊत, श्रीराम भुजाडे, भूमेश्वर बिसेन, संजय हिरापुरे, विनोद पटले, मनीष बैस, संभुजी बिसेन, सुरेश गुप्ता, करण टेकाम, सुनील पटले, शैलेश वासनिक, श्रीधर चन्ने, रौनक ठाकूर सहित ग्रा. प. पदाधिकारी, गावकरी व मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

