राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आमगावात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
आमगाव: भवभूती शिक्षण संस्था आमगाव संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे विज्ञानाचे जनक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये डी. फार्मसी आणि बी. फार्मसी विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. खुशी गुप्ता आणि प्रा. वैशाली चुटे यांनी केले. या स्पर्धेत उत्कृष्ट ज्ञानाचे प्रदर्शन करणाऱ्या विजयी चमूला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. पी. निंबेकर, संस्थेचे संचालक मंडळाचे सचिव केशवभाऊ मानकर तसेच सर्व प्राध्यापक उपस्थित होते. त्यांनी विजेत्या तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि विज्ञानाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन व प्रगतीसाठी विद्यार्थी प्रयत्नशील राहावेत, असा संदेश दिला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

