के.के. इंग्रजी प्रायमरी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन

0
283

विद्यार्थ्यांनी सादर केले नाविन्यपूर्ण प्रकल्प; विज्ञान क्षेत्रात प्रगतीसाठी प्रेरणा

आमगाव – भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्त के.के. इंग्रजी प्रायमरी शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे कार्यकारी डी.के. संगी सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

प्रदर्शनीचे उद्घाटन भवभूती शिक्षण संस्थेचे सदस्य  ललित मानकर सर, सदस्य श्रीमती स्नेहा ताई मानकर तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती रीना भुते यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, प्रदर्शनाचे परीक्षण रोशनी अग्रवाल मॅडम व राणी भगत मॅडम यांनी केले.

या विज्ञान प्रदर्शनीमध्ये नर्सरी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रकल्प सादर केले आणि उत्कृष्ट सादरीकरण केले. पालक, विज्ञान विषयाचे शिक्षक आणि इतर शिक्षकवर्ग यांचेही या उपक्रमात मोठे योगदान राहिले. विशेष म्हणजे, ही प्रदर्शनी सर्वांसाठी खुली करण्यात आली होती, त्यामुळे बाहेरील नागरिकांनीही प्रदर्शनाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेचे संगणक शिक्षक  मुकुल अग्रवाल सर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. डी.के. संगी,  ललित मानकर सर आणि प्राचार्या श्रीमती रीना भुते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.

या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यास हातभार लागला.

Previous articleविज्ञानाचा सन्मान, उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न
Next articleजि.प. शाळा मोहगाव येथे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजळली