आमगाव : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहगाव (केंद्र कातुर्ली) येथे दि.२८ फेब्रूवारी रोजी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पना सादर केल्या. “आजचे विद्यार्थी, उद्याचे शास्त्रज्ञ” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी नवोपक्रम आणि सर्जनशीलता दर्शविली.
या विज्ञान प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प आणि प्रयोग सादर केले. त्यामध्ये प्रामुख्याने हवेचे गुणधर्म, पाण्याची घनता, हवेचा दाब, किण्वन प्रक्रिया, पाणी शुद्धीकरण, डिजिटल इंडिया, सूर्य माला, तार्यांचा प्रवास यांसारख्या विषयांवर प्रयोग करण्यात आले. या प्रकल्पांचे योग्य प्रकारे विश्लेषण करून त्याचे सादरीकरण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते विद्यार्थी
विज्ञान प्रदर्शनातील उत्तम प्रकल्पांसाठी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
प्रथम क्रमांक: विधी शेंडे
द्वितीय क्रमांक: रोहित कावळे (इयत्ता ३री)
तृतीय क्रमांक: श्रेया कावळे (इयत्ता ५वी)
कार्यक्रमात इयत्ता ३री ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मुख्याध्यापक महेंद्र कथे यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयोगांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वैज्ञानिक बनण्याकरिता प्रेरित केले आणि त्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विषय शिक्षिका कु. सारीका मडावी, श्री. रोशन बिसेन, कु. वैशाली भुते यांनी विशेष मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

