भुताईटोला (गोरेगाव) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळा संपन्न

0
38

हनुमान मंदिर जीर्णोद्धार, सभामंडप व देवी जागरणासह आरोग्य शिबीराचे आयोजन

गोरेगाव – मौजा भुताईटोला (सांसद आदर्श ग्राम पाथरी) येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार, खासदार प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून सभामंडपाचे उद्घाटन तसेच इंजिनिअर कृष्णकमल केवलराम बघेले यांच्या स्वनिधीतून हनुमान मंदिराचे प्रवेशद्वार उभारणी करण्यात आली. याशिवाय केवलराम जियालाल बघेले यांनी दान केलेल्या निधीतून शारदा माता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.

श्री प्रभू रामजी, चक्रवर्ती सम्राट राजाभोज, भगवान बिरसा मुंडा आणि माँ गढकालिका यांचे सामूहिक दरबार गावकऱ्यांनी उभारले असून, त्यांचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव स्वराज सप्ताह, संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह आणि सम्राट राजाभोज जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषध वाटप करण्यात आले. महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व वाण वितरण, तसेच दहिकाला आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले. रात्री देवी जागरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय केवल भाऊ बघेले होते. तसेच, आमदार राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते या विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये डॉ. पुष्पराज गिरी, पन्नालाल बोपचे, सोमेशजी रहागडाले, खुशाल वैद्य, भूपेश गौतम, कृष्णकुमार बिशेन, इंजिनिअर मनिश धमगाये, डिलेश्वर ताई तिरेले, हिरन ताई तिरेले, घनेश्वर तिरेले, डॉ. गणेश बघेले, सुनील कापसे, अनिल मळावी, रविकांत  लाजेवार, दादी भाऊ शहारे, सोनवाणे महाराज, नंदूप्रसाद महाराज, प्रेमलाल घरत महाराज, देवचंद जी राऊत, भूमेश्वर राऊत, डॉ. शदिप पटले, डॉ. बिसेन, डॉ. पेमेंद्र ठाकूर, मनिषा ताई मेश्राम व आशा सेविका यांचा समावेश होता.

भुताईटोला, पाथरी, सिलेगाव, मेगाटोला व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.