गोंदिया येथे आरोग्य क्षेत्रात नवे पर्व; उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवांसाठी नवे दालन उघडले
गोंदिया: अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी युक्त रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चा भव्य शुभारंभ आज बोपचे पेट्रोल पंप, अवंती चौक, रिंग रोड, गोंदिया येथे मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटनाचे दीपप्रज्वलन आणि फीत कापून या हॉस्पिटलचे लोकार्पण माजी आमदार राजेंद्र जैन आणि आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध
रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल हे ब्रेन ट्रॉमा आणि ट्युमर सर्जरी, एंडोस्कोपी स्पाइनल व ब्रेन सर्जरी, अॅडव्हान्स न्यूरो सर्जरी, बर्न युनिट, ऑर्थो व बोन रिप्लेसमेंट, युरोलॉजी, तसेच डायलिसिस यांसारख्या अद्ययावत वैद्यकीय सेवांसह रूग्णांच्या सेवेसाठी समर्पित आहे. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अनुभवी डॉक्टर्सच्या मदतीने हे रुग्णालय सर्व प्रकारच्या तांत्रिक व आरोग्य सेवांसाठी उत्कृष्ट सेवा प्रदान करेल. रुग्णांसाठी २४ तास सेवा उपलब्ध राहील, अशी माहिती डॉ. बघेले यांनी दिली.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विजय रहांगडाले, केतन तुरकर, डॉ. संदीप मेश्राम, सुनील पटले, डॉ. ओम बघेले, डॉ. निशांत करवाडे, डॉ. स्विटी बघेले, डॉ. विनय रहांगडाले, डॉ. आकांशा करवाडे, डॉ. मिताली रहांगडाले तसेच इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या हॉस्पिटलच्या स्थापनेमुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे. विशेषतः न्यूरो सर्जरी आणि ट्रॉमा केअरमध्ये हे रुग्णालय मोलाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

