सहा तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्रांचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गोंदिया : स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी आणि विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच स्पर्धात्मक परीक्षांची ओळख व्हावी, या उद्देशाने ध्येय प्रकाशन अकॅडमी, महाराष्ट्रतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘विनर ऑफ द इयर’ या परीक्षेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पहिली ते आठवीच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मोठ्या आत्मविश्वासाने परीक्षा दिली.
सहा तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्रांचे आयोजन:
ही परीक्षा ओएमआर सीटवर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. जिल्ह्यातील आमगाव, देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी, गोंदिया आणि तिरोडा या सहा तालुक्यांमध्ये परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
तालुका निहाय परीक्षा केंद्रे आणि विद्यार्थी संख्या:
आमगाव: पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, ठाणा – 73 विद्यार्थी
देवरी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धीवरीनटोला – 22 विद्यार्थी
गोरेगाव: पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, हिरडामाली – 31 विद्यार्थी
सडक अर्जुनी: जिल्हा परिषद हायस्कूल, सडक अर्जुनी – 27 विद्यार्थी
गोंदिया: जानकीदेवी चौराकडे हायस्कूल, कुडवा – 31 विद्यार्थी
तिरोडा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खडकी – 64 विद्यार्थी
परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेत सहभाग घेतला.
जिल्हा संयोजक वशिष्ठ खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या तालुका समन्वयक श्रीमती मीनल टेंभरे यांनी परीक्षेच्या आयोजनात विशेष जबाबदारी पार पाडली.
परीक्षा केंद्र संचालक:
गोंदिया: समीर तिडके
तिरोडा (खडकी): देविदास हरडे
सडक अर्जुनी: अनिल वैद्य
गोरेगाव (हिरडामाली): सुनील ठाकूर
देवरी: मलेश मदनुरे
आमगाव (ठाणा): एन. एस. कोरे
परीक्षा आयोजन व सहकार्य करणारे शिक्षक व शिक्षिका:
- साधनव्यक्ती: धनवंत कावळे
- शिक्षक: शिवाजी माखने (देवरी), आनंद सरवदे (काळिमाटी), प्रफुल्ल ठाकरे (मुख्याध्यापक), मोरेश बिसेन (हिरडामाली), मोहन बिसेन (निंबा)
- शिक्षिका: एम. ए. उरकुंडे (डोंगरुटोला), कु. दीपिका सातपुते (खडकी), कु. शिल्पा कोल्हे (भिवापूर), कु. योगिता बुरडकर (सेजगाव), कु. वैशाली पेटकर (रापेवाडा), श्रीमती अनिता मानकर, कु. प्रियंका केवट, श्रीमती प्रिती मेश्राम (ठाणा), कु. प्रीती भुरसे (मनेरी), प्रियंका पाटील (मुरपार/राम), अनिता टेकाडे (डोंगरगाव)
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अशा उपक्रमांची महत्त्वाची भूमिका असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे संयोजकांनी सांगितले.

