श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0
154
1

महिला सशक्तीकरण व नेत्रदानाबाबत मार्गदर्शन

आमगाव – भवभूती शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आमगाव येथे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भवभूती शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती स्नेहा मानकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस सब-इन्स्पेक्टर जयश्री गव्हाणे (पोलीस स्टेशन, आमगाव) आणि डॉ. श्रुती डोये (आयनोवा आय हॉस्पिटल, आमगाव) उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुलसीदास निंबेकर यांनी देखील या कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात मिस. जयश्री गव्हाणे यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास, कठोर परिश्रम आणि यशस्वी कारकिर्दीबद्दल विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. श्रुती डोये यांनी नेत्रदानाच्या महत्त्वाविषयी माहिती देत त्याचे सामाजिक आणि वैद्यकीय फायदे स्पष्ट केले.

यावेळी डी. फार्म आणि बी. फार्मच्या विद्यार्थिनींसह प्रा. राणी भगत, प्रा. दीक्षा खोब्रागडे, प्रा. रोशनी अग्रवाल, खुशी गुप्ता, वैशाली चुटे, ज्ञानेश्वरी पटले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बिसेन, मृदालि कठाने आणि श्रीदय भांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. राणी भगत यांनी केले.

कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनींमध्ये महिला सशक्तीकरण, आत्मनिर्भरता आणि नेत्रदानाचे सामाजिक महत्त्व याविषयी जनजागृती करण्यात आली.

Previous articleकर्तव्यदक्ष महिलाओं का सम्मान : श्री जीवन गौरव फाउंडेशन द्वारा महिला सत्कार समारोह आयोजित
Next articleगोंदिया नगर परिषदेत महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार