राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला दिन साजरा; भजन मंडळाला वाद्य सामग्रीचे वाटप
गोंदिया: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोंदिया शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नगर परिषद सभागृह, गोंदिया येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गोंदिया नगर परिषदेत कार्यरत कर्तव्यनिष्ठ महिला कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, नगर परिषद मुख्याधिकारी संदीप छिद्र्वार आणि डीसिओ चुन्नीलाल राणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री शिव मंदिर, विवेकानंद कॉलोनी येथील महिला भजन मंडळाला हार्मोनियम, तबला आणि अन्य वाद्य सामग्री माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमात सविता नानू मुदलियार, कुंदा वेनेश्वर पंचबुद्धे, मालती राजेश कापसे, हर्षा बन्सोड, मनीष बेनिसाल, सुनंदा बिसेन, माधुरी खोब्रागडे, राजेश दवे, नागो बंसोड, तुषार उके, श्रेयस खोब्रागडे, अविनाश महावत, लव माटे, महेश रंगारी, कुंदा गौतम, तारा बावनथडे, प्रीती पटले, प्रीती मेश्राम, सुमन भोयर, प्रेमलाल मेश्राम आणि रमेशलाल मेश्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगर परिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन खुशाल कटरे यांनी व्यक्त केले.

