राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे महिला सक्षमीकरणाचा संकल्प
गोंदिया – राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माजी आमदार राजेंद्र जैन यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, तर प्रमुख उपस्थितीत महिला जिल्हाध्यक्ष सौ. राजलक्ष्मी तुरकर, सुरेश हर्षे, पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, माधुरी नासरे, नेहा तुरकर, सुधा राहंगडाले, कीर्ती पटले, बिरजुला भेलावे यांचा समावेश होता.
महिला सध्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत असून सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५०% आरक्षण उपलब्ध असल्याने त्या अधिक संख्येने पुढे येणे आवश्यक आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच लाडली बहिण योजना आणि रोजगाराच्या संधींविषयीही चर्चा झाली.
माजी आमदार राजेंद्र जैन यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात नानू मुदलियार, केतन तुरकर, राजू एन. जैन, टी. एम. पटले, डी. यू. रहांगडाले, आशा पाटिल, सरला चिकलोंडे, रजनी गिरिपुंजे, सुशीला हलमारे, जया धावडे, शर्मिला पाल, पायल बग्गा, रुचिता चौहान, संगीता माटे, पर्वता चांदेकार, गीता चौधरी, सुनीता थेर, पुस्तकला माने, अर्चना ताराम, सीमा शेन्डे, सुरेखा रहिले, सुमन बिसेन, तोमसीना नागपुरे, ज्योत्स्ना लिल्हारे, लता रहांगडाले, सोलानी ब्राम्हणकर, वनिता कोरे, रिना रोकडे, मोनिका सोनवाने, वंदना डोंगरवार, पंचशिला मेश्राम, विश्रांति थुलकर, गुणवंता कापगते, पुष्पमाला बडोले, खिलवंता येडे, कृष्णा कोरे, पुष्पा डोंगरवार, संगीता कोवे, उषा होडकर, पुष्पा गुप्ता, प्रमिला बडवाईक, ललिता चौधरी, अनिता हरिनखेड़े, राधिका कोहडे, संगीता आंबेडारे, सरोज सिंगन्धुपे, लक्ष्मी बाई, विमला उइके, अर्चना चौधरी, रविकला नागपुरे, विमला श्रीभद्रे, मुमताज खान, भूमेश्वरी इनवाते, उमा सिंग, किरण रहमतकर, प्रमिला मानकर, योगिता मेश्राम, लता मेश्राम, यशोदा मेश्राम, निशा मानकर, अरुणा लिल्हारे, तोमसी नागपुरे, सुरेखा रहिले, चेतना कांबले, प्रमिला गावडकर, मंजूषा बारसागडे, चेतना ताई, ममता राहंगडाले, किरण राहंगडाले, सुंदरी तांडेकर, पायल बागडे, चेतना पराते, रीना गौतम, वर्षा राहंगडाले, खुशबू चौधरी, सोनम मेश्राम, पूर्णिमा मेश्राम, प्रकाश बरिया, शैलेश वासनिक, शरभ मिश्रा यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला संघटन मजबूत करण्याचा निर्धार
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला सशक्तीकरणासाठी अधिकाधिक कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला. महिलांनी आपल्या अधिकारांसाठी पुढे येण्याची गरज असून, त्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

