के.पी. असाटी पब्लिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0
43

के.पी. असाटी पब्लिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 तिरोडा | 08 मार्च 2025 : के.पी. असाटी पब्लिक शाळा, पालडोंगरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्रीमती कोमल अटलानी (चाईल्ड कौन्सलर) होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती ममताताई दुबे (लोकमत सखी मंच), श्रीमती पुर्णिमाताई शर्मा (सामाजिक कार्यकर्त्या), श्रीमती अर्चनाताई येरपुडे (सामाजिक कार्यकर्त्या), श्रीमती नैनाताई अग्रवाल (सामाजिक कार्यकर्त्या), श्रीमती सुप्रियाताई वासनिक (वकील), श्रीमती मेघाताई असाटी, श्रीमती बिंदा तिवारी, श्रीमती श्यामाबाई असाटी, श्रीमती रेखाबाई असाटी, तसेच विद्यालयाचे संचालक दिलीपजी असाटी व  संस्कार असाटी, तसेच विद्यालयाचे प्राचार्य जावेद शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवी माता सरस्वती यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यानंतर विद्यालयाचे संगीत शिक्षक  आशिष लिल्हारे यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत भेटकार्ड, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन करण्यात आले.

संस्थापक  दिलीपजी असाटी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

  • प्रमुख अतिथी श्रीमती ममताताई दुबे यांनी महिला सशक्तीकरण व त्यांच्या सामाजिक योगदानावर मार्गदर्शन केले.

  • श्रीमती सुप्रियाताई वासनिक यांनी नारीशक्ती व महिला शिक्षणाचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.

  • मुख्य अतिथी श्रीमती कोमल अटलानी यांनी महिलांच्या विविध भूमिका आणि त्यांच्यावरील सामाजिक जबाबदाऱ्या यासह विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूल्ये समजावून सांगितली.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. कु. कृतिका कावळे (९वी), कु. नैशी रहांगडाले (१०वी), कु. नेहल पाटील (१०वी), आणि मनीष रहांगडाले (१०वी) यांनी सुवर्णपदक मिळवल्यामुळे त्यांचा भेटकार्ड, पुष्पगुच्छ व सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.

महिला दिनानिमित्त महिला पालक वर्गातील एका महिलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पहिल्यांदा उपस्थित झालेल्या महिला पालकांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात शिक्षिका आशा बरीकर, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व महिला पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सूत्रसंचालन विद्यालयाचे सहशिक्षक दमाहे सर यांनी केले.आभार प्रदर्शन सहशिक्षक रामटेके सर यांनी केले.

या कार्यक्रमातून महिला सशक्तीकरण, शिक्षणाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी विचार मांडण्यात आले.

के.पी. असाटी पब्लिक शाळेने घेतलेला हा स्तुत्य उपक्रम समाजात महिलांच्या भूमिकेचा गौरव करणारा ठरला.

Previous articleराज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती द्यावी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
Next articleराजमाता गाईला जीवदान – सालेकसा पशुवैद्यकीय दवाखान्यात यशस्वी शस्त्रक्रिया