विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रम रंगतदार
गोंदिया – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कटंगटोला येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. गीता ताई बावनथडे (शाळा व्यवस्थापन समिती सदस्य) होत्या.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक नंदकिशोर चित्रीव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. झेड. नखाते (सहायक शिक्षक) यांनी केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी पारंपरिक आणि सृजनशील नृत्यप्रस्तुती देत संपूर्ण वातावरण आनंदमय केले.
यावेळी सुगंधाई मल्टी सर्विसेस सेंटर, बस स्टॉप, खमारी यांचे प्रोप्रायटर ज्ञानेश्वर (नानू) लाडे आणि त्यांचे सहकारी धनराज मेश्राम व सतीश उके यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक वर्ग अध्यापनाच्या पुस्तिका निशुल्क वाटप करून स्तुत्य कार्य केले. शाळेच्या वतीने या उपक्रमाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, उपसरपंच श्रीमती लीलाताई उके, स्थानिक पदाधिकारी, तसेच माता-पालक गटाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे महिला सशक्तीकरण व शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित झाले.

