जागतिक आर्य वैश्य महासभा (वाम) प्रचार व प्रसार बैठकीत विविध विषयांवर मंथन.

0
91

अहेरी… जागतिक आर्य वैश्य महासभा महाराष्ट्र अहेरी विभागाची बैठक *श्री कन्याका परमेश्वरी देवस्थान सभागृह, आलापल्ली* येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत समाजातील विविध मान्यवर सदस्यांनी हजेरी लावली.बैठकीचे *संचालन पूर्वा डोंटुलवार यांनी केले, तर विशाल कटकमवार (संघटक प्रमुख, महाराष्ट्र राज्य)* यांनी आपल्या प्रास्ताविकात *वामचे पाच उद्देश स्पष्ट करून सांगितले*. आणि *वाम ॲप डाऊनलोड करून त्याचा प्रभावी उपयोग कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.*

यावेळी *सुदेश कापरतीवार यांनी वाम बद्दल विविध विषयांवर माहिती दिली*, तर *सुरज गुंडावार यांनी वाम संघटनेचा प्रचार आणि प्रसार कसा वाढवता येईल यावर भर दिला.अमोल कोलपाकवार यांनी शिक्षण, कार्ड आणि समाजाच्या इतर विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणली.*

बैठकीदरम्यान समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी काही ठोस निर्णय घेण्यात आले. *MOU सदस्य अमृता पराग आइनचवार (Honda Showroom) यांनी ३०००/- रुपयांचे योगदान आणि उपहार जाहीर केले, तसेच राजेश मुप्पावर (Muppawar General Stores) यांनी १०% सवलत जाहीर करत समाजाच्या सहकार्याची भावना व्यक्त केली.*

समाजाच्या प्रसार व प्रचारासाठी नवीन उपक्रम हाती घेण्याबाबतही यावेळी सखोल चर्चा झाली. जागतिक आर्य वैश्य महासभेच्या प्रगतीसाठी विविध संकल्पना मांडण्यात आल्या. बैठकीला *सुदेशजी कापर्तीवार (जागतिक सहसचिव), विशाल कटकमवार (संघटक प्रमुख, महाराष्ट्र राज्य), सूरज भाऊ गुंडावार (सचिव, चंद्रपूर जिल्हा), पराग बोंकंटीवार (समन्वयक, चंद्रपूर शहर), संतोष मड्डीवार (अध्यक्ष, अहेरी आर्य वैश्य समाज), आणि विनोद अक्कनपल्लीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.*

कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन पूर्वा डोंटुलवार (सांस्कृतिक समन्वयक, महाराष्ट्र राज्य) यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमृता आईचवार (वाम सदस्य, महाराष्ट्र राज्य) यांनी केले.*

बैठकीच्या शेवटी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या बैठकींचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

Previous articleकटंगटोला शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
Next articleजागतिक महिला दिन: महिलांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवावी – न्यायाधीश सुलभा चरडे