तिरोडा : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वडेगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘सन्मान सावित्रीच्या लेकींचा’ या उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन (दि.८ मार्च) करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. तुमेश्वरीताई बघेले (सदस्य, जिल्हा परिषद गोंदिया) या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख मा. व्ही. टी. डोंगरे सर, केंद्र मुख्याध्यापक चिरवतकर सर, कु. गीता हरीणखेडे मॅडम, कु. निशा वंजारी मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान केंद्रातील सर्व महिला शिक्षिका, स्वयंसेवक आणि स्वयंपाकी मदतनीस यांना पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले. या वेळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण केंद्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

