श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
150

स्त्रीशक्तीचा गौरव, उत्सव आनंदाचा!

आमगाव – श्री स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शोभा शर्मा मॅम, ब्रुजमाला बोपचे मॅडम, वाळके मॅडम आणि किरण शर्मा मॅडम यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मृती छपरिया मॅडम यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील शिक्षिकांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालनाची जबाबदारी शिवानी छपरिया आणि सुनीता बहेटवार यांनी समर्थपणे पार पाडली. पाहुण्यांचे औपचारिक स्वागत मधुसूदन डोये सर आणि ओमेश टेंभरे सर यांनी केले.

महिला दिनानिमित्त मुकेश कांबळे सर आणि तेजश्विनी छपरिया मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली झुंबा सत्र देखील आयोजित करण्यात आले, ज्यात सर्व उपस्थितांनी आनंदाने सहभाग घेतला.

स्त्रीशक्तीचा सन्मान व शुभेच्छा संदेश

शाळा व्यवस्थापन समितीतील प्रतिष्ठित मान्यवरांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये श्री. लीलाधर कलंत्री सर, श्री. राजेश गोयल सर, डॉ. जितेंद्र वाळके सर, डॉ. ललित कलंत्री सर, डॉ. विकास जैन सर, डॉ. लता जैन मॅडम आणि डॉ. भाग्यश्री वाळके मॅडम यांचा समावेश होता.

स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरू शकतात हे दाखवून देत या कार्यक्रमाद्वारे त्यांच्या योगदानाला सन्मान देण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आपल्या कलेतून आपली प्रतिभा सादर केली.

होळीच्या रंगांनी साजरा झाला आनंद सोहळा

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी गाण्यांच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य सादर केले. उपस्थितांना फुलांच्या पाकळ्यांनी आणि गुलालाने सन्मानित करण्यात आले. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली व सर्वांना गोड मिठाई वाटण्यात आली.

निरोप समारंभ कोठारी मॅडम यांनी घेतला आणि कार्यक्रमाचा आनंददायी समारोप झाला.

 

Previous articleसन्मान सावित्रीच्या लेकींचा : वडेगाव येथे जागतिक महिला दिन साजरा
Next articleविद्यानिकेतन कॉन्वेंट, आमगाव येथे जागतिक महिला दिन व आनंद मेळावा उत्साहात संपन्न