क्रिएटिव्ह माईंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

0
38

“स्त्रीशक्तीचा गौरव – कलेचा सन्मान!”

नाशिक, :  “तू सकलांची आई, सातजन्माची पुण्याई, तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान!” या उदात्त भावनेने प्रेरित होत क्रिएटिव्ह माईंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष सोहळ्यास महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजिका आणि ‘नमस्ते नाशिक फाउंडेशन’च्या अध्यक्ष स्नेहल ताई देव होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे मॅडम आणि शिक्षकवृंद सायली जोंधळे, कविता गुरव, पूजा वानखडे, शिल्पा जगताप, तानिया ललवाल, समीक्षा भालेराव, सीमा दानी, संगीता बागुल, कामिनी पटेल आणि इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.

महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

पाककला स्पर्धा – महिलांच्या हातच्या चविष्ट पदार्थांचा अनोखा अनुभव!

स्पर्धेत मोनिका अनिल घाडगे, अश्विनी सचिन पवार, श्रुती सुवास पवार, सायली कमलेश मस्के आणि नीलम पवन पवार यांनी सहभाग घेतला. त्यांनी विविध चविष्ट आणि आकर्षक पदार्थ सादर करून उपस्थितांना अचंबित केले.

प्रथम पारितोषिक: अश्विनी सचिन पवार आणि नीलम पवन पवार
सर्व महिलांनी त्यांच्या उत्कृष्ट कलागुणांचे कौतुक केले.

वेशभूषा स्पर्धा – भारतीय संस्कृतीचे विविध पैलू उलगडले!

रक्षा विजय घेगडमल, रेखा सुनील केदारे, जोशना प्रशांत पवार, संगीता गणेश वारजे आणि नीलम पवन पवार यांनी भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे रंग सादर करत वेशभूषेच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश दिला.

रांगोळी स्पर्धा – रंगांतून दिला सामाजिक संदेश!

जयश्री निलेश उगाडे आणि रक्षा विजय घेगडमल यांनी आपल्या रांगोळीच्या माध्यमातून “पाणी वाचवा”, “बेटी बचाव” यासारखे सामाजिक संदेश प्रभावीपणे साकारले.

स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना पुष्पगुच्छ आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. उपस्थित महिलांनी गाण्यांच्या तालावर नृत्य करत, विविध खेळांमध्ये सहभागी होत, हा आनंद सोहळा साजरा केला.

अशा प्रकारे क्रिएटिव्ह माईंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांच्या कलेचा आणि सामर्थ्याचा उत्सव ठरला!

 

Previous articleविद्यानिकेतन कॉन्वेंट, आमगाव येथे जागतिक महिला दिन व आनंद मेळावा उत्साहात संपन्न
Next articleगोंदिया जिल्हा नूटा संघटनेच्या कार्यकारिणीची नव्याने स्थापना